नाशिकमधील प्रसिद्ध फर्निचर किंग शोरूम आता धुळ्यात

दिवाळीनिमित्त धुळ्याच्या शाखेत ५ दिवसांसाठी देण्यात आकर्षक ऑफर जाहीर

परवडणाऱ्या किंमतीनुसार वैविध्यपूर्ण फर्निचरची विस्तृत श्रेणी उपलब्ध करुन दिलेल्या फर्निचर किंग या दालनाने नुकताच उत्कृष्ट सेवा, वस्तूंचा दर्जा आणि ग्राहकांचे समाधान या त्रिसूत्रीच्या बळावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. याच बळावर नाशिकमधील फर्निचर किंगने धुळ्यातील देवपूर बस स्टँडजवळ असलेल्या बंग कॉम्प्लेक्समध्ये दालन सुरू केले असल्याची माहिती दुकानाचे मालक-संचालक भवानीशंकर अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, फर्निचर किंगतर्फे दिवाळीनिमित्त धुळ्याच्या शाखेत केवळ ५ दिवसांसाठी उत्कृष्ट ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

यापेक्षा स्वस्त धुळ्यात अन्यत्र कुठेही नाही

बजाज व एच.डी.एफ.सी.फायनान्सची सुविधा या दालनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. याशिवाय वॉर्डरॉब, साईड टेबल, वॉल युनिट, इम्पोर्टेट अॅण्ड पार्टीकल, सेंटर टेबल, यातील असंख्य पर्यायामधून ग्राहकांना आपली मनपसंत वस्तू खरेदी करता येते. एवढेच नव्हे तर विविध शासकीय व खासगी कार्यालयांसाठी आवश्यक फर्निचरची येथील दालनात उपलब्ध आहे. दालनाचे वैशिष्टय म्हणजे ग्राहकांची तक्रार केवळ ४८ तासांत दूर केली जाते. ग्राहकांना मोफत घरपोच डिलिव्हरी आणि पाच वर्षाची सर्व्हिस वॉरंटीदेखील मिळते. दिशाभूल करत फसवा डिस्काऊंट दिला जात नाही. तसेच, कोणतेही छुपे चार्जेस लावले जात नाहीत.

शहरात आजही एखाद्या वस्तूची किंमत कमी केली की, त्या वस्तूचा दर्जा घसरल्याचे दिसते. मात्र आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत कधीही वाटाघाटी करत नसल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत दालन खुले राहणार आहे.