घरमहाराष्ट्रनाशिकचेनस्नॅचिंग, मोबाईलचोर सराईत गुन्हेगार गजांआड

चेनस्नॅचिंग, मोबाईलचोर सराईत गुन्हेगार गजांआड

Subscribe

नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चेनस्नॅचिंग व मोबाईल चोरी करणार्‍या पाचजणांना अटक केली आहे.

नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चेनस्नॅचिंग व मोबाईल चोरी करणार्‍या पाचजणांना अटक केली आहे. त्यातील इतर दोघे सराफी व्यवसायिक व अल्पवयीन आहे. दोन सराईत गुन्हेगारांनी शहरात १८ चेनस्नॅचिंग व दरोड्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी ज्या सराफी व्यवसायिकास सोने विकले, त्या सराफी व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २९८ ग्रॅम वजनाच्या सोन्याची लगड, असा ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कैलास हरी भांगरे (१८), योगेश दामू कडाळे (२१) अंकुश सुरेश निकाळजे (१९, रा.गोविंदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

१५ मे रोजी संदीप हॉटेलचा वेटर काम संपवून पायी घरी जात असताना नासर्डी नदी मारूती मंदिर पुलाजवळ त्यास तिघा सराईत गुन्हेगारांनी अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्याकडील ११०० रुपये बळजबरीने हिसकावून घेत तिघेजण पसार झाले. याप्रकरणी वेटरने मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुंबईनाका पोलिसांनी तपास सुरू करत शिताफीने चौघांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली. योगेश कडाळे व अंकूश निकाळजे यांची चौकशी केली असता, त्यांनी शहरात १८ चेनस्नॅचिंग व दरोड्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी ज्या सराफी व्यवसायिकास सोने विकले, त्यास पोलिसांनी अटक केली आहे. सराफी व्यावसायिकाकडून २९८ ग्रॅम वजनाच्या सोन्याची लगड, असा ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. योगेश कडाळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर १५ विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीनावर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, विजय ढमाळ, सोमनाथ गेंगजे, सुखदेव काळे, मधुकर घुगे, संजय भिसे यांनी कारवाई केली.

- Advertisement -

पोलीस ठाणेनिहाय गुन्हे

सर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहेत. सोनसाखळीचोरीसह लुटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, असे १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. सराईत योगेशविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हेही उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

तिघेजण चेनस्नॅचर व दरोडेखोर

सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, विजय ढमाळ आणि मुंबईनाका पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. त्यातील तिघेजण चेनस्नॅचर व दरोडेखोर आहेत. उर्वरित सराफी व्यवसायिक व अल्पवयीन आहे. तिघा सराईत गुन्हेगारांकडून १८ चेनस्नॅचिंग व दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -