घरमहाराष्ट्रनाशिकनाल्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू

नाल्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू

Subscribe

अंगणात खेळता-खेळत चिमुकली घराजवळील नाल्यात बुडाल्याची घटना चितेगाव येथील ठाणगेवस्ती येथे घडली. विद्या सुरेश ठाणगे (११, रा.चितेगाव, ता.निफाड) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. घराच्या अंगणात खेळत असताना विद्या बाजूलाच असलेल्या नाल्यात जाऊन पडली असता पोहता येत नसल्याने ती नाल्यात बुडाली. ती नाल्यात बुडाल्याचे समजताच कुटुंबियांनी तिला नाल्यातून बाहेर काढले. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -