घरमहाराष्ट्रनाशिकविदर्भ एक्स्प्रेसमध्ये सापडला ५१ लाखांचा ऐवज

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये सापडला ५१ लाखांचा ऐवज

Subscribe

विदर्भ एक्सप्रेसमध्ये आढळलेल्या दोन संशयास्पद बॅगमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल ५१ लाख ३७ हजार ९४६ रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडल्याने खळबळ उडाली आहे.

विदर्भ एक्सप्रेसमध्ये आढळलेल्या दोन संशयास्पद बॅगमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल ५१ लाख ३७ हजार ९४६ रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेतील मुद्देमाल ताब्यात घेत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) गुन्हा दाखल केला.

शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही. एम. जाधव, कॉन्स्टेबल विजय खलगे, सागर वर्मा यांचे पथक नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये (१२१०६) गस्त घालत होते. कोच क्रमांक एस-३ मध्ये त्यांना एका प्रवाशांच्या डोक्याखाली साखळी लावलेली बॅग शाल टाकून ठेवलेल्या स्थितीत आढळली. चौकशी केली असता या व्यक्तीने आपले नाव नरेंद्र छकिलालजी बमनेल (४०, मानसगंज, अमरावती) असे सांगितले. आपण प्रॉपर्टी डिलर असून बॅगेत मोठी रक्कम असल्याचेही त्याने सांगितले. मुंबईत कालबादेवी रोडला पार्टीला हा ऐवज देण्यासाठी चालल्याची माहिती त्याने दिली. आपल्यासोबत गोपाल नरेंद्र पांचारिया (२३, गोरक्षण रोड, व्हीएचबी कॉलनी, अकोला) हा सहकारी असून, तो एस-७ या कोचमधून प्रवास करत असल्याचे बमनेल यांनी सांगितले. त्याच्याकडेही मोठी बॅग होती. पांचारियाने सोन्याचा ऐवज मुंबईत कारागीराकडे दुरुस्तीसाठी नेत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

या दोघांना आरपीएफच्या पथकाने नाशिकरोड स्टेशनला आणले. तेथील आरपीएफच्या कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, संजय गांगुर्डे, तसेच दोन पंचांसमक्ष दोन्ही बॅगा उघडण्यात आल्या. एका बॅगेत ४३ लाख ७६ हजार ५०० ची रोकड आणि ४०.२८ ग्रॅमचे एक लाख २८ हजार ८९६ किंमतीचे सोने आढळले. दुसऱ्या बॅगेत एक लाख ७२ हजार ६१४ रुपयांचे हिरे आणि १४२.७३ ग्रॅमचे चार लाख ५९ हजार ९३६ रुपये किंमतीचे सोने आढळले. हा एकूण ५१ लाख ३७ हजार ९४६ रुपयांचा आहे. आरपीएफने ही माहिती आयकर खात्याला कळवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -