घरमहाराष्ट्रनाशिकपाच तोळे सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावली

पाच तोळे सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावली

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेंना येथील घटना

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेना गावातून पूजा करून निघालेल्या महिलेची पाच तोळे सोन्याची पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून मोटार सायकल वरून पलायन केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडक सुकेने येथील ताराबाई पोपट गणोरे या आज दुपारी हरतालिका पूजा निमित्त खडक सुकेना गावातील मळ्यातून गावात रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याची पोत हिसकावून पलायन केले. ताराबाई गनोरे यांच्यासोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळाली, परंतु तोपर्यंत दुचाकीवरील चोरट्यांनी भरधाव मोटर सायकल चालवीत घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचत घटनेचा तपास सुरू केला आहे. याबाबत पोपट गणोरे यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -