घरमहाराष्ट्रनाशिकहुश्श्य...! गुरुवारची पाणीकपात रद्द

हुश्श्य…! गुरुवारची पाणीकपात रद्द

Subscribe

गंगापूर धरण ५३ टक्के भरल्याने महानगरपालिकेने घेतला निर्णय

गंगापूर धरण ५३टक्के भरल्याने गुरुवारची संपूर्ण दिवसाची पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. दररोजचा एक वेळचा पाणीपुरवठा मात्र या पुढेही बंद राहणार आहे. धरण ७० टक्के भरल्यानंतर दोन वेळेचा पाणीपुरवठा करण्याचा विचार केला जाणार आहे.

दरम्यान ३० जुलै पासून सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे ७५ एमसीएफटी म्हणजे सात दिवस पुरेल इतकी पाण्याची बचत झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -