घरताज्या घडामोडीकारवर महाराष्ट्र शासन स्टिकर लावून फिरणे पडले महागात

कारवर महाराष्ट्र शासन स्टिकर लावून फिरणे पडले महागात

Subscribe

कारसह दोघांना अटक

शासनाच्या कोणत्याही सेवेत नसताना चारचाकी गाडीवर महाराष्ट्र शासन व अत्यावश्यक आरोग्य सेवा असे स्टिकर लावून फिरणाऱ्या चालक व त्याच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कार जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप यांनी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संभाजी दतात्रय सोमवंशी, साथीदार अशोक गुलाब पवार (दोघेही रा.सुंदरपूर, ता.निफाड) अशी अटक करण्यात आलेेल्याची नावे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर सोमवारी पोलीस कारवाई करत होते. निफाड शांतीनगर त्रिफुलीवर निफाड पोलिसांना मारूती ईर्टीका ( MH 15 FF 2043)वर मागील व पुढील बाजूस महाराष्ट्र शासन व अत्यावश्यक सेवा आरोग्य विभाग असे लिहिले आढळले. पोलिसांनी गाडीतील चालकाची व वाहनांची अधिक कसून चौकशी केली असता कोणतीही व्यक्ती शासनाच्या सेवेत आढळले नाही व त्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. शासनाकडे वाहन अधिग्रहित नसताना वाहन फिरवले म्हणून पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप यांनी फिर्याद दाखल करून संभाजी दतात्रय सोमवंशी व त्याचा साथीदार अशोक गुलाब पवार यांना गाडीसह अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -