घरमहाराष्ट्रनाशिकशहरात चंदनचोरी करणारी टोळी गजाआड

शहरात चंदनचोरी करणारी टोळी गजाआड

Subscribe

शहर गुन्हे शाखेची कारवाई

कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्‍या पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातून एकदा व महाराष्ट्र पोलीस अकादमीतून दोनदा चंदनचोरी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणाची पोलीस आयुक्तांनी दखल घेत शहर गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखेने सापळा रचत टोळीला कारसह अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी चंदनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
संजय माणिक जाधव (२५, रा.पाथर्डी, पळसे शिवार), अनिल उत्तम जाधव (१९, रा.पळसे शिवार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी ५ जून रोजी पर्यावरण दिनाच्या दिवशीच तीन चंदनाची झाडे लंपास केली. सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाला मारहाण करत चंदनाच्या झाडांची चोरी केली. त्यानंतर सातपूर एमआयडीसीतील कंपनीच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत दुसर्‍यांदा चंदनाच्या झाडांची चोरी झाली. शहरात चंदनतस्करांचा सुळसुळाट झाल्याने पोलिसांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गुन्हे उघडकीस येत नसल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहर गुन्हे शाखेस गुन्हे उघडीस आणण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

ग्रामीण भागात पाल टाकून राहणारे व अंगावर चाबूक मारुन उपजिविका कारणारे लोक शहरात चंदनचोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत गिरणारे येथून संजय जाधव, अनिल जाधव या दोघांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून इंडिगो कार जप्त केली. पोलिसांनी त्याच्याकडून सातपूर व गंगापूरमधील प्रत्येकी दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -