घरमहाराष्ट्रनाशिकगुरुवंदना संगीत सोहळा शुक्रवारी, गायन-वादनाच्या सुरमई अविष्काराची अनुभूती

गुरुवंदना संगीत सोहळा शुक्रवारी, गायन-वादनाच्या सुरमई अविष्काराची अनुभूती

Subscribe

पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार, १ फेब्रुवारीला गुरुवंदना संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिककर रसिकांना प्रसिद्ध कलाकार विश्वमोहन भट यांच्या मोहनविणेची सुरमई अविष्कार आणि दिल्लीतील युवा कलाकार अभिषेक मिश्रा यांच्या जुगलबंदीची अनुभूती घेता येणार आहे.

पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार, १ फेब्रुवारीला गुरुवंदना संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिककर रसिकांना प्रसिद्ध कलाकार विश्वमोहन भट यांच्या मोहनविणेची सुरमई अविष्कार आणि दिल्लीतील युवा कलाकार अभिषेक मिश्रा यांच्या जुगलबंदीची अनुभूती घेता येणार आहे. याशिवाय गाण्यांची सुरेल मैफल या सोहळ्याला एका अविस्मरणीय उंचीवर नेऊन ठेवणार आहे.

महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५ वाजता या गुरुवंदना सोहळ्याला प्रारंभ होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, आणि ग्लोबल व्हिजन शाळेचे सचिव शशांक मणेरीकर आदी उपस्थित राहणार आहेत. विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचे प्रथम पुष्प पं. शंकरराव वैरागकर यांच्या ज्येष्ठ शिष्यांच्या रागमाला या कार्यक्रमाने गुंफले जाणार आहे. त्यात गायक आनंद अत्रे, सागर कुलकर्णी हे विविध गाणी सादर करतील. तर दुसऱ्या पुष्पात पद्मश्री व ग्रॅमी पुरस्कारप्राप्त पं. विश्वमोहन भट हे मोहनविणेच्या सादरीकरण करतील. याच कार्यक्रमात त्यांच्या सुरमई अविष्कारासोबतच युवा कलाकार अभिषेक मिश्रा यांच्या जुगलबंदीची अनुभूती नाशिककर रसिकांना घेता येणार आहे. मोहन वीणा हे वाद्य पं. विश्वमोहन भट यांनी सतार, गिटार, सरोद आणि व्हायोलीन यांचे गुण साधत स्वत: निर्माण केले आहे.

- Advertisement -

गुरुवंदनेच्या परंपरेनुसार कार्यक्रमाचे तिसरे पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व गुरुवर्य शंकरराव वैरागकर यांच्या गायनाने होईल. संपूर्ण कार्यक्रमात ओंकार वैरागकर हे तबला, कृष्णा बैरागी, आनंद अत्रे व सागर कुलकर्णी हे हार्मोनियमवर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाला नाशिककर रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ओंकार वैरागकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, सरीता वैरागकर आदींनी केले आहे.

सोहळ्याला ३८ वर्षांची परंपरा

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येतो. नाशिकमधील गुरुवंदना कार्यक्रमाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. पं. शंकरराव वैरागकरांच्या सर्व शिष्यांनी मिळून गुरूला दिलेली एक सुरमई मानवंदना म्हणून गुरुवंदना संगीत सोहळ्याकडे पाहिले जाते. सर्व शिष्यांना नावाजलेल्या कलाकारांची कला ऐकायला मिळावी, हादेखील या गुरुवंदना संगीत महोत्सवामागील हेतू आहे. यात उद्योन्मुख कलाकार, तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांना निमंत्रित केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -