घरमहाराष्ट्रनाशिकमुल होत नसल्याने पत्नीचा छळ

मुल होत नसल्याने पत्नीचा छळ

Subscribe

पत्नीची पतीविरोधात तक्रार

लग्नाला चार वर्षे झाली तरी पत्नीला मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. तुला नांदवायचे नाही, तु माहेरी निघून जा असे म्हणत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पीडितेने पतीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेच्या लग्नाला चार वर्षे होवूनही मूल होत नसल्याने पती-पत्नी वाद होत होते. इलेक्ट्रिक दुकानासाठी माहेरून २ लाख रूपये आणावेत, यासाठी पतीने पत्नीकडे मागणी केली होती. पत्नी पैसे देत नसल्याने तिला घरातून हकलून देत पत्नीने नांदवण्यास नकार दिला. पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -