घरमहाराष्ट्रनाशिकहृदयविकारामुळे त्याने सोडले एमसीएचे शिक्षण

हृदयविकारामुळे त्याने सोडले एमसीएचे शिक्षण

Subscribe

दुर्गेश पंढुरेची शोकांतिका; दानशुरांना मदतीसाठी आवाहन

पाचवीला पूजलेले दारिद्र्य आणि त्यात जडलेला हृदय विकाराचा आजार यामुळे जेलरोड येथील दुर्गेश गंगाराम पंढुरे यांचे उच्च शिक्षण मध्यातच थांबले आहे. एमसीएच्या पहिल्या वर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर या आजारामुळे त्याचे शिक्षण थांबले आहे. यापूर्वीच्या शस्त्रक्रियेवर बराच पैसा खर्च झाल्याने आता त्याच्याकडे पुढील उपचारासाठी पैसाच शिल्लक राहिलेला नाही. समाजातील दानशुरांनी मदतीचा हात पुढे केल्यास दुर्गेशला वैद्यकीय उपचार करता येईलच. शिवाय त्याचे उच्च शिक्षणाचीही इच्छा पूर्ण होणार आहे.

लहानशा खोलीत राहणार्‍या दुर्गेशचे शिक्षण बीसीएसपर्यंत पूर्ण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षणासाठी त्याने डाटा एंट्रीचे काम करण्यास सुरुवात केली; परंतु बालपणापासून असलेल्या हृदय विकाराच्या आजाराने त्याला जर्जर केले. त्याच्या हृदयाला छिद्र होते. त्यामुळे मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यात त्याचा मोठा पैसा खर्च झाला. आता पुन्हा एकदा हृदय शस्त्रक्रिया करणे गरजेचे झाले आहे. यासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

येथे करता येईल मदत

दानशूर व्यक्तींनी त्याला आर्थिक मदत केल्यास त्याची ‘लाईफ-लाईन’ वाढू शकते. ‘राम मंगल हार्ट फाउंडेशन प्रायव्हेट लिमीटेड’ च्या नावाने आयसीआयसीआय बँकेच्या १४७५०५०००९३० (आयएफसी कोड- आयसीआयसीआय०००१४७५) या खाते क्रमांकावर मदत करावी, असे आवाहन दुर्गेशने केले आहे. अधिक माहितीसाठी ७४४७३५३६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -