घरमहाराष्ट्रनाशिकउन्हाच्या झळा; नाशिक @ ४२.७

उन्हाच्या झळा; नाशिक @ ४२.७

Subscribe

रविवारी २८ एप्रिलला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिकला ४२.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाच्या झळांनी राज्य होरपळून निघाले आहे. रविवारी २८ एप्रिलला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिकला ४२.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिवसभर गरम हवा वाहत असताना उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण केले. आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकचे तापमान मागील १७ वर्षात पहिल्यांदा कमाल ४१ च्या पुढे गेले आहे.

विदर्भातील अकोला येथे सलग तिसर्‍या दिवशी यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्यप्रदेशातील खारगोणे येथे देशातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उद्या सोमवारी, २९ एप्रिलला कोकण, गोवा लातूर, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत असून, उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. विदर्भात सर्वाधिक तापमान असून अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा अक्षरश: भाजून निघाले आहे. पुणे, नगर, सातारा, परभणी येथेही उष्णतेची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४१ ते ४६ अंशांच्या दरम्यान असून अकोला, अमरावती, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, परभणी, धुळे येथे तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. मध्यप्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वार्‍यांच्या स्थितीपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, सोमवारी, २९ एप्रिलला कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील लातूरसह परिसरातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -