नाशिक शहरासह परिसरात मुसळधार

शहर परिसरात आल्हाददायक वातावरण

Nashik
Rainfall Entry in Mumbai
मुंबईत पावसाची दणक्यात एन्ट्री

सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या नाशिक शहरात बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. राज्यात पावसाने विलंब केला असला तरी नाशिकमध्ये मात्र मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर जागोजागी पावसाचे पाणी तुंबले आहे. या मोसमात पहिल्यांदाच एवढा मुसळधार आणि जास्त वेळ पाऊस नाशिककरांनी अनुभवला. त्यामुळे सध्या शहर परिसरात आल्हाददायक वातावरण झालेले होते. दिवसभरात जिल्ह्यात ८.७ मिमी पैकी सर्वाधिक पाऊस देवळा ५.६ मिमी त्याखालोखाल नाशिक शहरात २.१ मिमी, सुरगाणा १.० मिमी, निफाड ०. ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरी ३९.७१ mm पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here