घरमहाराष्ट्रनाशिकराज्यातील स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बळी नाशिकमध्ये

राज्यातील स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बळी नाशिकमध्ये

Subscribe

सहा महिन्यात दहा मृत्यू; प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आज कार्यशाळा

गेल्या सहा महिन्यांत राज्यात स्वाईन फ्लूने १५० रुग्णांचा बळी घेतला असून त्यात सर्वाधिक प्रमाण नाशिक जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जूनमध्ये तीन तर जुलैत एका रुग्णाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व खासगी डॉक्टरांसाठी आयएमए हॉलमध्ये शुक्रवारी (ता. १२) सकाळी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्वाईन फ्लूने राज्यात थैमान घातले आहे. प्रारंभी केवळ पावसाळ्याच्या काळात या आजाराचे रुग्ण आढळून येत. सध्या मात्र वर्षभर स्वाईन प्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षी राज्यात स्वाइन फ्लूमुळे १८ ऑक्टोबर २०१८ पर्यंत २४४ रुग्ण दगावल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. स्वाइन फ्लूमुळे नाशिकमध्ये ७६, पुणे शहरात ६४, पिंपरी-चिंचवडमध्ये ३३, सातार्‍यात २८ आणि कोल्हापूरमध्ये १७ लोक दगावले होते. यंदा देखील राज्यात नाशिकच आघाडीवर असून सहा महिन्यात दहा रुग्णांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

राज्याचे अधिकार्‍यांचे मार्गदर्शन

स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता आयएमए हॉलमध्ये प्रतिबंधक उपाययोजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, साथ रोग नियंत्रण विभाग सहसंचालक डॉ. प्रदीप आवटे, सहसंचालक डॉ. भोई मार्गदर्शन करणार आहेत.

उत्पत्ती स्थळांसाठी प्रत्येकी ३०० रुपये दंड

स्वाईन फ्लू आजाराचा प्रादूर्भाव वाढल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गृहभेटी सुरू केल्या आहेत. यात डास उत्पत्ती स्थळे आढळून आलीत. या स्थळांची फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात कोणी दोषी आढळल्यास प्रत्येक स्थळामागे ३०० रुपये दंड तर व्यावसायिक आस्थापनांसाठी एक ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

तपासणीत आढळून आले ३८२ डास उत्पत्ती केंद्र

-९० घरगुती
-६० तळघरे
-१६६ भंगार आणि टायरची दुकाने
– ६ ड्रेनेज दुरुस्ती स्थळे
– ३५ प्राणी व पक्षांसाठीची भांडी
– १४ शाळा
-४७ नवीन बांधकामे

स्वाइन फ्लूूची लक्षणं –

-अचानक ताप येणे (१०० फॅरनाईट व त्याहून अधिक)
-थकवा जाणवणे
-थंडी भरणे
-तीव्र डोके दुखी
-सर्दी व खोकला होणे
-सतत शिंका येणे
-घसा खवखवणे
-भूक न लागणे
-डायरिया (अतिसार)

अशी घ्यावी काळजी-

-पौष्टिक आहार घ्यावा
-भरपूर पाणी प्या आणि चांगली झोप घ्यावी.
-शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडासमोर रुमाल धरावा.
-प्रवास करताना तोंडाला मास्क लावावा
-डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे
-फ्लूसारखी लक्षणे दिसून आली, तर बाहेर जाणे टाळावे
– घरीच राहून आराम करावा
-लक्षणे वाढत असल्यास डॉक्टरांकडे जावे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -