महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे निषेध

निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत रोष व्यक्त केला.

Nashik
Balkavade1
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत  घटनेचा निषेध केला. औरंगाबाद येथे आयोजित निरोगी जीवन या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तथा माजी मंत्री फौजिया खान, तसेच विद्या चव्हाण, नाशिकच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी सहभागी झालेल्या होत्या.