घरमहाराष्ट्रनाशिकमतदानाच्या दुसर्‍या दिवशी सुट्टी; आयोगाची खुशखबर

मतदानाच्या दुसर्‍या दिवशी सुट्टी; आयोगाची खुशखबर

Subscribe

आयोगाचा निर्णय, ३० हजार कर्मचार्‍यांकडून स्वागत

लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना मतदानाच्या दुसर्‍या दिवशी सुटी मिळणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेसाठी रात्रंदिवस झटणार्‍या कर्मचार्‍यांना काहीशी विश्रांती मिळणार आहे. यापूर्वी कर्मचारी वर्गाने निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करत आयोगाने निर्णय घेतला आहे.

नाशिक लोकसभेसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. याकरता ३० हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कामाकरता कर्मचारी वर्ग फारसा उत्सुक नसतो. त्यात सुटीच्या दिवशी मतदान प्रशिक्षण,तसेच मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदान केंद्रावर मुक्कामी जाणे, पुन्हा मतदान झाल्यानंतर मतपेट्या जमा करेपर्यंत कर्मचार्‍यांवर जबाबदारी असते. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मतदानाचा हक्क प्रत्येकाला बजावता यावा याकरता शासकीय, निमशासकीय कार्यालयांना पगारी सुटी जाहीर केली आहे. खासगी आस्थापणांनी सुटी द्यावी किंवा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची रजा द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहे.

- Advertisement -

मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारची सुटी मिळत नाही. उलट मतदान झाल्यानंतर ग्रामीण भागातून मतदान यंत्र घेऊन येताना पहाट उजाडते. यानंतर या कर्मचार्‍यांना पुन्हा आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर राहावे लागते. त्यामुळे कर्मचार्‍यांची मोठी दमछाक होते. या कर्मचार्‍यांना दिलासा देताना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी कर्मचार्‍यांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -