धक्कादायक! एकच मोबाईल आणि तीन भावंड; अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बहिणीची आत्महत्या

मोबाईल नसल्यामुळे बारावीत शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Suicide
आत्महत्या

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनलॉक-४ची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय देखील काही प्रमाणात सुरु करण्यात आले आहेत. मात्र, या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता मात्र, शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु, ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देखील दिले जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक अडथळे येत आहेत. याच अडथळ्यांच्या परिणामांना घाबरुन बारावीत शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नेमके काय घडले?

नाशिकच्या सटाणा महाविद्यालयात रेवती संजय बच्छाव ही विद्यार्थीनी विज्ञान शाखेत बारावीत शिकत होती. तिच्या घरातील परिस्थिती अत्यंत बेताची असून त्यांच्या घरात एकच मोबाईल आणि तीन भावंडे शिकणारी आहेत. तर रेवतीचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे तीन पाल्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी ते मोबाईल पुरवू शकत नव्हते. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष होते.

दरम्यान, कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला. मात्र, बच्छाव यांच्या घरात एकच मोबाईल असल्याने तिला अभ्यास करण्यासाठी मोबाईल मिळत नसे. त्यामुळे आपला अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने तिने विषारी औषध घेत आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमुळे शिर्डी साईबाबा मंदिराचे उत्पन्न कमी पण ऑनलाइन देणगीत वाढ