Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र पत्नीला वाचवण्यास गेलेल्या पतीचा बुडून मृत्यू

पत्नीला वाचवण्यास गेलेल्या पतीचा बुडून मृत्यू

Related Story

- Advertisement -

विहिरीत तोल जाऊन पडल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाला. पत्नीला वाचविताना पतीचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.७) धुळे जिल्ह्यातील बळसाणे येथे घडली. लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

रब्बी हंगाम सुरु असल्याने दोघेजण शेताची काम उरकत होते. पती लक्ष्मण याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या. पाणी काढत असताना त्याचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. ही बाब पतीच्या लक्षात येताच त्याने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघांचा मृत्यू झाला. सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

- Advertisement -