पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या

murder

भांडणात पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सातपूरमधील वासाळी शिवारात उघडकीस आली. या घटनेमुळे वासाळी गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वैशाली बाळू खेटरे (वय २८) असे मृत्यू झालेल्याचे महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली खेटरे पतीसोबत वासाळी मारुतीमंदीर परिसरात भाड्याने राहत होती. सोमवारी रात्री पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वादात पती बाळू खेटरे याने वैशालीला मारहाण केली. ती सकाळी वैशाली मृत अवस्थेत आढळून आली. ही बाब पोलिसांना समजताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला असता तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले.