घरमहाराष्ट्रनाशिकपत्नीच्या जाचातून पतीची सुटका

पत्नीच्या जाचातून पतीची सुटका

Subscribe

खोटे आरोप करणार्‍या पत्नीपासून घटस्फोट

पतीवर खोटे आरोप करत बदनामी करणार्‍या पत्नीपासून न्यायालयाने पतीची पत्नीच्या जाचातून सुटका केली आहे. दिवाणी न्यायाधीश विशाल साठे यांनी पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला आहे.

एकलहरे येथील रामदास (नाव बदलले) याचा विवाह सुनिताशी २००५ मध्ये झाला. सुनिताने सासरी पतीसह सासरच्या मंडळींचा छळ केला. २०१४ पासून ती माहेरी राहण्यास आली. त्यांना दोन मुले आहेत. सुनितापासून घटस्फोट मिळण्यासाठी रामदासने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पतीविरोधात सुनिताने न्यायालयात अर्ज केला होता. पतीने अनैतिक संबंध ठेवले, मारहाण केली, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पैशांची मागणी करत जाळण्याचा प्रयत्न केला, असे तिने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले होते. मात्र, तिला न्यायालयात पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे तिला पतीसोबत राहणे शक्य नाही, असा निष्कर्ष दिवाणी न्यायाधीश विशाल साठे यांनी काढत रामदासचा अर्ज मंजूर करुन पत्नीपासून घटस्फोट देण्याचा निर्णय दिला. पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे अ‍ॅड. धमेंद्र चव्हाण यांनी पतीच्या बाजूने काम पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -