घरमहाराष्ट्रनाशिकविवाहितेला रॉकेल टाकून पेटवून मारण्याचा प्रयत्न, पतीसह सासऱ्याला अटक

विवाहितेला रॉकेल टाकून पेटवून मारण्याचा प्रयत्न, पतीसह सासऱ्याला अटक

Subscribe

आगरटाकळी, राजवाडा भागात राहणाऱ्या विवाहितेवर राॅकेल ओतून पेटवून तिला ठार मारण्याचा गंभीर घटना गुरुवार, ३१ जानेवारीला उघडकीस आली. या घटनेत विवाहिता ३५ टक्के भाजली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

आगरटाकळी, राजवाडा भागात राहणाऱ्या विवाहितेवर राॅकेल ओतून पेटवून तिला ठार मारण्याचा गंभीर घटना गुरुवार, ३१ जानेवारीला उघडकीस आली. या घटनेत विवाहिता ३५ टक्के भाजली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. उपनगर पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिना सिद्धार्थ औटे (२०) ही विवाहिता आजारी असल्याने उपचारासाठी पतीसोबत तळेगाव, इगतपुरी येथे गेली होती. बुधवार, ३० जानेवारीला सायंकाळी ६ वाजता घरी परतल्यावर हिनाचे सासरे मिलिंद नारायण औटे यांनी हिनाला घराच्या अंगणातच रोखत शिवीगाळ व मारहाण केली. महिलेने पती सिद्धार्थ मिलिंद औटे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली, मात्र त्यानेही तुला वैतागलो असल्याचे सांगत घरातून रॉकेलची कॅन आणून तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी हिनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत ती ३५ टक्के भाजली असून, प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सिद्धार्थ औटेसह मिलिंद औटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -