शरद पवार यांच्यासारख्या नेत्याकडून काश्मीरबाबत अपप्रचार – मोदी

Nashik
I have come to greet Devendra Fadnavis said Narendra Modi
नाशिकमध्ये संबोधित करताना नरेंद्र मोदी

‘काँग्रेस पक्ष संभ्रमात आहे, मात्र शरद पवार अनुभवी आहेत. शरद पवार सारखे अनुभवी नेते मतांसाठी चुकीचे वक्तव्य करतात, तेव्हा फार वाईट वाटते. शरद पवारांना पाकिस्तान चांगला वाटतो. तेथील राजवट त्यांना योग्य वाटते. मात्र, संपूर्ण जग जाणतो की, दहशतवादाचा कारखाना कुठे आहे’, असे मोदी म्हणाले. विरोधकांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे देश बदनाम होत असल्याचेही मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी गुरुवारी नाशिकमध्ये आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याकडून काश्मीरबाबत अपप्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय ‘काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णयाचा विरोधकांकडून फक्त विरोध करायचा म्हणून विरोध केला जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. परंतु, हे राष्ट्रहिताचे नाही. यामुळे देशाची बदनामी होते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करायला आलो आहे – मोदी

‘मी देवेंद्र फडवीस यांच्यासारख्या यात्रेकरुला वंदन करण्यासाठी नाशिकमध्ये आलो आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी गुरुवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा सुरु होती. याअगोदर दोन टप्प्यांमध्ये महाजनादेश यात्रा संपन्न झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेच्या समारोपाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये महाजनादेश यात्रा सुरु होती. या तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे करण्यात आला. गुरुवारी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोदींनी नाशिककरांना आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.

…म्हणून मोदींचे फडणवीस यांना वंदन

‘प्रत्येकाला तीर्थयात्रेला जाता येईल, असे नसतेच. त्यामुळे जे तीर्थयात्राकरुन येतात, त्यांना आपण नमस्कार करतो. नमस्कार केल्यानंतर आपल्याला त्या यात्रेकरुचे अर्धे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे मी देवेंद्रजींना नमस्कार करायला आलो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर महाजनादेश यात्रेमार्फत यात्रा केली. या यात्रेमार्फत त्यांना कोट्यवधी नागरिकांचा आशीर्वाद मिळाला’, असे नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय भाषणात नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार सारख्या अनेक योजनांचे कौतुक केले.