घरमहाराष्ट्रनाशिकहाडांच्या बेकायदेशीर कारखान्यांवर छापे

हाडांच्या बेकायदेशीर कारखान्यांवर छापे

Subscribe

मालेगाव पवारवाडी हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर हड्डी कारखान्यांवर अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने छापे टाकत ते सील केले.

मालेगाव पवारवाडी हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर हड्डी कारखान्यांवर अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने कारवाई करत सील केले. रविवारी (३१ मार्च) सायंकाळी या पथकाने ओवाडी नाला परिसरातील ४ ते ५ बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई केली असून, रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुंबई-आग्रा महामार्गावर मागील आठवड्यात मृत जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रविवारी विशेष पोलीस पथकाने बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हड्डी व चरबी कारखान्यावर कारवाई केल्याने या कारखान्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी असलेले हड्डी उकळण्याचे साहित्य पालिका प्रशासनाच्या मदतीने नष्ट केले जाणार आहे. बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई दरम्यान, काहींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईस पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दुजोरा दिला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

- Advertisement -

बेकायदेशीर हड्डी, चरबी व साबण कारखान्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कारखान्यातील दुषित पाणी मोसम नदी, नाल्यामध्ये सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होते आहे. याविषयी हरित लवाद यांच्याकडे देखील तक्रार केली असून लवादाने वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान पालिका व पोलीस प्रशासनास हे कारखाने नष्ट करण्याबाबत स्पष्ट सूचना केल्या होत्या. यापूर्वी अशी कारवाई देखील झाली होती. मात्र, आता पुन्हा या बेकायदेशीर हड्डी कारखाने सुरू झाल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -