घरताज्या घडामोडी९३ लाखांचा मद्यसाठा ‘एक्साईज’ने केला जप्त

९३ लाखांचा मद्यसाठा ‘एक्साईज’ने केला जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने शुक्रवारी (दि.४) मध्यरात्री अहमदनगर-मनमाड रोडवर, पिंपळगाव जलाल शिवार (ता.येवला) येथे सापळा रचत दोनजणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पथकाने दहाचाकी ट्रकसह ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. सालदार नर, शहादा (जि.नंदुरबार) संजय साहेबराव पाटील (वय ३६), काशीनाथ बुधा पाटील (वय ४३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर मद्य तस्करांची टोळी कार्यरत असल्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्तवली आहे.

अहमदनगर-मनमाड रोडवर अवैध मद्यसाठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (दि.४) अहमदनगर-मनमाड रोडवर, येवला टोलनाक्याजवळ, पिंपळगाव जलाल शिवार (ता.येवला) या ठिकाणी वाहन तपासणीचा सापळा रचला. त्यावेळी पथकाने दहाचाकी ट्रक (एमएच ०४-डीएस २९२८)ची तपासणी केली. या ट्रकमध्ये विदेशी, देशी मद्याचे ६५० बॉक्स आढळून आले. बॉक्समध्ये ९३ लाख ६३ हजार ४२० रुपये किंमतीच्या १ हजार १५२ बाटल्या दिसून आल्या. पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ट्रकसह मद्यसाठा जप्त केला.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -