घरमहाराष्ट्रनाशिकशहरात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू

शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू

Subscribe

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी (ता.१०) जाहीर झाला. देशभरात ७ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. मतदानाचा अखेरचा टप्पा २९ एप्रिलला संपेल.

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी (ता.१०) जाहीर झाला. देशभरात ७ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. मतदानाचा अखेरचा टप्पा २९ एप्रिलला संपेल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनीही वेग घेतला आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघांसाठीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील विविध बॅनर्स उतरवतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पदाधिकार्‍यांच्या गाड्या जमा करण्यात येत आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारपासून लागू केली आहे. त्यानुसार नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ३१ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार, जिल्ह्यात ४४ लाख ३८ हजार ७१ मतदार आहेत. आयोगाच्यावतीने नवमतदारांच्या नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहीमेतील मतदारांची नावेही यात सामाविष्ट करण्यासाठी पुरवणी मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यात मतदान होणार आहे. रविवारी आचारसंहीता लागू झाल्यापासून आदर्श आचारसंहीतेची अंमलबजावणीचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेत राजकीय पक्ष व पदाधिकार्‍यांचे फलक व झेंडे तातडीने काढण्याचे आदेश दिले. तसेच सर्व महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांतील पदाधिकार्‍यांकडे असलेली शासकीय वाहनेही तातडीने जमा करण्याचे फर्मान काढण्यात आले.

- Advertisement -

२०१४ मध्ये ३८ लाख मतदार

गत म्हणजेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ लाख ५ हजार ४९३ मतदारांची नोंद करण्यात आली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १५ लाख ४९ हजार ८६ मतदारांची नोंद करण्यात आली होती. धुळे मतदारसंघात मोडणार्‍या मालेगाव बाह्य मतदारसंघात २ लाख ३२ हजार १५७, मालेगाव मध्यमध्ये २ लाख ८२ हजार ९६९ तर बागलाण तालुक्यात २ लाख ३७ हजार १५६ मतदारांची नोंद करण्यात आली.

सीमावर्ती भागात विशेष लक्ष

निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात याकरता विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध मद्य वाहतूक, मतदारांना प्रलोभने दाखवणे अशा घटनांवर या पथकाची नजर असेल. विशेष करून पेठ, सुरगाणा, कळवण तसेच गुजरात राज्याच्या हद्दीलगतच्या दिव दमण, दादरा नगर हवेली येथून मद्याची तस्करी होण्याची शक्यता गृहीत धरून या भागावरही पथकामार्फत विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांची बैठक

आचारसंहीता लागू होताच जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार सोमवारी (ता.११) सकाळी सकाळी सर्व नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -