महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास सक्तमजुरी

accused to life imprisonment in woman burned case
महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास शिक्षा

नवीन वीज जोडणी देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून २४ हजार रुपयांची लाच घेणार्‍या वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडेय यांनी मंगळवारी (दि.६) एक वर्ष सक्तमजुरी दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दीपक उल्हास चौधरी असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.

जेलरोड येथील तक्रारदार एका हौसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांच्या सोसायटीत ८ नवीन वीज जोडणी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जुलै २०१६ रोजी महावितरणशी संपर्क साधला. त्यावेळी चौधरी याने तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पथकाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. २१ जुलै २०१६ रोजी २४ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना चौधरी यास अटक केली. त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कापसे यांनी युक्तीवाद केला. चौधरी यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपयाची शिक्षा सुनावली.