नाशकात कॉंग्रेसमध्ये इनकमिंग ! बघा कोण जातंय कॉंग्रेसमध्ये

प्रदेशाध्यक्ष आ.थोरात यांच्या उपस्थितीत जि.प.सदस्य हिरामण खोसकरांसह अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Nashik

संपूर्ण राज्यात राजकीय पदाधिकार्‍यांचे पक्षबदलीची लगबग सुरू आहे. यात प्रामुख्याने भाजप आणि सेनेमध्ये जणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. पण नाशिकमध्ये मात्र काही उमेदवार मात्र कॉंग्रेसमध्ये जात असल्याने नाशिक कॉंग्रेसला अच्छे दिन आल्याची चर्चा आहे.

नाशिक जिल्हा परीषदेचे विद्यमान सदस्य हिरामण खोसकर यांनी तसेच माजी पं.स.सभापती गोपाळा लहांगे,भारतीताई भोये,मोतीराम दिवे यांनी आज संगमनेर येथे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला असून यावेळी इगतपुरी,त्र्यंबकेश्वर मधील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे,शहराध्यक्ष शरदराव आहेर,माजी जि.प.उपाध्यक्ष संपतराव सकाळे,जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ता प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष रमेश कहांडोळे,उत्तमराव भोसले,मधुकर लांडे,तालुकाध्यक्ष रामदास धांडे,कचरू पा.शिंदे,नार्दन माळी,मधुकर कोकणे,युवक काँग्रेसचेभास्कर गुंजाळ,अरुण गायकर,मा.सभापती आनंदराव सहाणे,वसंतराव मुसळे,भारत टाकेकर,मधुकर कोकणे,आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.ईगतपुरीचे मा.सभापती गोपाळा लहांगे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोतकर,भारतीताई भोये,मोतीराम दिवे,कैलास बेंडकुळे हे राष्ट्रवादीतुन काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

हे देखील वाचा – विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन चूक केली – पृथ्वीराज चव्हाण

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसला मोठी जुनी परंपरा असून काँग्रेस पक्ष हा लोकशाही मजबूत करणारा व नागरिकांना विकासा समवेत घेऊन चालणारा पक्ष आहे.सर्वसामान्यांसाठी शाश्वत विकासाची परंपरा असलेला हा पक्ष आहे. विद्यमान भाजप-सेना सरकारने फक्त जाहिरातबाजी केली असून जनतेला फसवले आहे. वाढती बेरोजगारी,आर्थिक मंदी,ढासळलेली अर्थव्यवस्था,अडचणीत आलेला शेतकरी ,वाढलेली महागाई या सर्व समस्या घेऊन काँग्रेस पक्ष लढत असून आगामी काळामध्ये काँग्रेसचे सरकार येईल,असा विश्वास व्यक्त करताना भाजप व सेनेमधून अनेक नेते काँग्रेसमध्ये आगामी काळात प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी हिरामण खोसकर म्हणाले की,काँग्रेसचा विचार हा गोरगरिबांच्या विकासाचा असून ईगतपुरी-ञ्यंबकेश्वर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.आपण पुरोगामी विचारांच्या पक्षात सामील झाल्याचा आनंद असून पक्ष देईल ती जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.