घरमहाराष्ट्रनाशिकबेशिस्त वाहनचालकांना पुराव्यांसहित दंडाची पावती घरपोहोच मिळणार

बेशिस्त वाहनचालकांना पुराव्यांसहित दंडाची पावती घरपोहोच मिळणार

Subscribe

वाहतूक नियंत्रण करणार्‍या सिग्नलकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने बेशिस्त वाहनचालकांना ‘कोडवेल किऑक्स’ मशीनमुळे दणका बसला आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नलवरील किऑक्स मशीनकडून सर्व घडामोडींचे चित्रण होत असून त्याचा पोलिसांना कारवाईसाठी ‘हायटेक’ पुरावा म्हणून उपयोग होत आहे. बेशिस्त वाहनचालकांना पुराव्यांसहित मशीनच्या मदतीने वाहतूक शाखेने इ-चलन दंडाची पावती घरपोहोच रजिस्टर पत्यावर पाठवल्या आहेत.

बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, महिलांच्या सुरक्षिततेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहरात ९ सप्टेंबरपासून उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे ‘कोडवेल किऑक्स’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. किऑक्स मशीनचे लोकार्पण पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असून प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला आहे. किऑस्क मशीन सप्टेंबरपासून ट्रॅफिक मॉनिटर व रहदारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शहरात मर्यादित पोलीस असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना किऑक्स यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. ही यंत्रणा शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे. मशीनच्या सहाय्याने सिग्नल परिसरातील निरीक्षण केले जात आहे. ही मशीन आता अद्यावत केली जाणार आहे.

- Advertisement -

अशी आहे किऑक्स मशीन

किऑक्स मशीनची मर्यादा ५ वर्षांपर्यंत आहे. मशीनची ऊंची ७ फूट आणि रुंदी अर्धा फूट आहे. या मशीनमुळे पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभागांची मदत मिळणे सोपे होत आहे. मशीनमध्ये पॅनिक बटण आणि कॅमेरा आहे. सिग्नलजवळ हे मशीन सर्व घटनावर करडी नजर ठेवत आहे. मुलींसह महिलांनी मदतीसाठी मशीनचे पॅनिक बटन दाबताच त्याची सूचना पोलिसांसह संबंधित यंत्रणेला मिळत आहे. तसेच कॅमेर्‍यामुळे सिग्नलवरील सर्व चित्रिकरण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करणे शक्य होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -