घरमहाराष्ट्रनाशिकवाढदिवसाच्या पार्टीत डीजे ऑपरेटरवर अमानुष अत्याचार

वाढदिवसाच्या पार्टीत डीजे ऑपरेटरवर अमानुष अत्याचार

Subscribe

नाशिक दरी-मातोरी येथील एका फार्म हाऊसवर पंचवटीतील एका गुंडाने आयोजित केलेल्या आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत टोळक्याने डीजे वाजवणार्‍या दोन युवकांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. गुंडांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतलेल्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक- दरी-मातोरी येथील एका फार्म हाऊसवर पंचवटीतील एका गुंडाने आयोजित केलेल्या आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत टोळक्याने डीजे वाजवणार्‍या दोन युवकांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. गुंडांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतलेल्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदेश काजळे (रा. पंचवटी), प्रितेश काजळे, सिद्धेश (रा. खैरे गल्ली, जुने नाशिक), सोनू (रा. नवीन नाशिक), सॅन्डी रिक्षावाला (रा.  मोरवाडी, सिडको) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दरी-मातोरी येथील बाणगंगा फार्महाऊसवर गुरूवारी (दि.९) रात्री ९ ते शुक्रवारी (दि.१०) मध्यरात्री ३ वाजेपर्यंत अत्याचाराचा प्रकार सुरू होता. संदेश काजळे याने वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त बाणगंगा फार्महाऊसवर पंचवटीतील शिंदे म्युझिक सिस्टीमला डीजे वाजवण्याची  सुपारी दिली होती.गुरूवारी रात्री दोन डीजे ऑपरेटर डीजेसह दरी-मातोरी येथील फार्म हाऊसवर आले. वाढदिवसाची पार्टी गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी म्युझिक सिस्टीमवर संशयितांचा धिंगाणा सुरू होता. त्यानंतर डीजे सिस्टीम व आवाज चांगला नाही, असे म्हणत मद्यपी टोळक्याने डी.जे. वाजवणार्‍या दोघांना विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर एकमेकांना अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडले. या घटनेत दोघेही वादक गंभीर जखमी झाले.

आमदाराच्या नावाने ठार मारण्याची धमकी

आम्ही आमदाराचे नातेवाईक आहोत. अत्याचार आणि मारहाणीचा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारू, अशा धमक्या गुंडांनी या दोघा जखमी युवकांना दिल्या. शुक्रवारी सकाळी दोघा वादकांनी गुंडांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पळ काढला. जीव मुठीत धरत दोघांनी थेट मित्रांचे घर गाठत आपबिती सांगितली. त्यानंतर मित्रांनी उपचारासाठी शुक्रवारी दुपारी जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. गुंडांनी या दोघांनाही बेदम मारहाण केली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

 

 

वाढदिवसाच्या पार्टीत डीजे ऑपरेटरवर अमानुष अत्याचार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -