घरमहाराष्ट्रनाशिकमाझी लेक माझं झाड माझी शाळा

माझी लेक माझं झाड माझी शाळा

Subscribe

तारुखेडले शाळेचा त्रिवेणी संगम उपक्रम

पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी वृक्षसंस्कृती जपणं ही काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने रविवारी (दि. ८) जिल्हा परिषदेच्या तारुखेडले (ता. निफाड) शाळेत माझी लेक, माझं झाड, माझी शाळा असा त्रिवेणी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील प्रत्येक मुलीच्या नावाने एक झाड लावून त्याला त्याला तिचे नाव देण्यात आले.

या उपक्रमाच्या निमित्ताने सध्या येथील शाळेत शिकणार्‍या मुली दुसर्‍या शाळेत जातील तेव्हा या झाडाच्या रुपाने त्यांचे भावनिक ऋणानुबंध कायम शाळेशी जोडले जातील. कन्या सासुराशी जाये, मागे परतोनी पाहे, अशा प्रकारे प्रत्येक मुलीला आपल्या माहेराची ओढ असते. आपल्या मुलीची आठवण म्हणून लावलेल्या झाडामुळे पालकांसाठीदेखील ती नेहमीच डोळ्यांसमोर असणार आहे, असे भावनिक आवाहन मुख्याध्यापक शिंदे यांनी केलं. तसेच, जागतिक तापमान वाढ, सततचा दुष्काळ, जलसिंचनासाठी वृक्षारोपन किती गरजेचे आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

- Advertisement -

झाडाच्या रुपाने मुली, पालक आणि समाजाला शाळेशी जोडून एक प्रकारे त्रिवेणी संगमच शाळेने साधला आहे. तारुखेडले शाळेला भव्य असे पटांगण लाभले आहे. मात्र, त्याभोवती झाडेच नव्हती. तेव्हा शाळेच्या संपूर्ण टीमने वनविभागाकडे पाठपुरावा करून ४० रोपे मिळवली. हे बघून गावातील शिक्षणप्रेमी व पर्यावरणप्रेमी पीएसआय माधव खंडू पवार व प्रशांत गवळी यांनी शाळेला अशोक, चिंच, कडूनिंब, गुलमोहर, आपटा, उंबर, पांगारा अशी अशी विविध ६० रोपे आणून दिली. त्यामुळे सर्व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला. हळूहळू संपूर्ण पटांगणाभोवती या उपक्रमाद्वारे वृक्षारोपण झाले.

वृक्षसंवर्धनही व्हावे म्हणून झाडाच्या रुपाने समाज आणि शाळेला या उपक्रमाने जोडून शाळेने अनोखी संकल्पनाच अन्य शाळांसमोर मांडली आहे. शाळेतील सर्व मुली शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज झाडांची काळजी घेत आहेत. उपक्रमाला अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सोसायटी आणि गावकर्‍यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेचे शिक्षक, मच्छिंद्र जगताप, मदन बिरादार, अनिल पवार, संदीप गायकवाड उपक्रम यशस्वितेसाठी कार्यरत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -