घरमहाराष्ट्रनाशिकसाठेबाज कांदा व्यापार्‍यांवर कारवाईचे निर्देश

साठेबाज कांदा व्यापार्‍यांवर कारवाईचे निर्देश

Subscribe

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे तहसिलदारांना पत्र; गोदामांची होणार नियमित तपासणी

केंद्र सरकारने, राज्य सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे तसेच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानूसार राज्य सरकारने देखील प्रशासनाला याबाबत निर्देश देले. त्यानूसार पुरवठा अधिकार्‍यांनी तहसिलदारांना पत्र देत कांदा व्यापार्‍यांच्या गोदामांची नियमित तपासणी करावी. त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. तसेच साठेबाजी करणार्‍यांविरोधात कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये जिल्ह्यात कांदा दराने नवनविन विक्रम प्रस्थापित केले असून खुल्या बाजारात कांद्याने ९० ते १०० रूपये दर गाठले आहेत.

खुल्या बाजारातील कांद्यांचे दर गगनाला भिडले

कांद्याचे वाढलेले भाव बघता साठेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कांदा व्यापार्‍यांच्या गोदामांची नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाला फटका बसला असून उत्पादनात घट झाली. साठेबाजीने डोकेवर काढल्याने खुल्या बाजारातील दर गगनाला भिडले होते. त्यामुळे हे दर अटोक्यात आणण्यासाठी मोठ्या व्यापार्‍यांना ५०० तर लहान व्यापार्‍यांना १०० क्विंटलपर्यंत कांदा साठवणूकीची मर्यादा केंद्र सरकारने घातली होती. त्याचा परिणाम म्हणजे खुल्या बाजारातील दर नियंत्रणात आले. परंतु, त्यानंतरही साठवणूकीच्या मर्यादा शिथिल न केल्यामुळे सरकारला टीकेचे धनी बनावे लागले. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून नविन कांदा बाजारात येऊ लागला आहे. कधी नव्हे ते बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या कांद्याला क्विंटलला सरासरी १२ हजार रूपयांचा उच्चांकी दर मिळत आहे. घाऊक बाजारात कांदाच्या दराने अचानक उसळी घेतली अ्सताना खुल्या बाजारातील कांद्याच्या दराने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात या कांद्याने पाणी आले आहे. अवकाळीमुळे झालेले नुकसान बघता तसेच बाजारात सध्या कांदा भाव खात असल्याने तसेच येत्याकाळात त्याची साठेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

कांदा साठेबाजीला बसणार लगाम

या पार्श्वभूमीवर केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सचिवांच्या समितींच्या बैठकीत देशभरातल्या कांद्याच्या वाढत्या किंमतीचा आढावा घेण्यात आला. ११ प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत गौबा यांना कांद्याचे दर नियत्रंणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच साठेबाजी करणाऱ्या व्यापार्‍यांवर कारवाईचे निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यानूसार जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी तहसिलदारांना पत्र लिहून कांदा व्यापार्‍यांच्या गोदामांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले असून उपलब्ध स्टॉकचा दैनंदीन अहवाल सादर करायला लावला आहे. तसेच कोठेही कांदा साठवणूकीचे प्रकार आढळल्यास तत्काळ जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही तहसिलदारांना देण्यात आल्या आहे. या निर्णयामुळे कोठेतरी कांदा साठेबाजीला लगाम बसणार आहे.


आता कांदा स्वस्त होणार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -