घरमहाराष्ट्रनाशिकवाहनांतील बॅगा चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

वाहनांतील बॅगा चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

Subscribe

चारचाकी वाहनमालकांना गाडीचे ऑईल लीक झाले आहे, असे सांगायचे आणि गाडीतील बॅग, रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीला नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक केली.

चारचाकी वाहनमालकांना गाडीचे ऑईल लीक झाले आहे, असे सांगायचे आणि गाडीतील बॅग, रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीला नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक केली. गुन्हे शाखेने शिर्डीत सापळा रचत सहाजणांना शिताफीने अटक केले. त्यांनी नाशिक, मुंबई व औरंगाबाद येथे चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख ७४ हजार ४३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीतील सहाजण दिल्लीचे असून त्यामध्ये एकजण अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उडकीस येण्याची शक्यता आहे.

संजय मुनीयांदी (३०, रा. नवी दिल्ली), बबलू फकीरा (३५, रा. नवी दिल्ली), किसन सेलूराज (३०, रा. नवी दिल्ली), करण गणेश (३०, रा. नवी दिल्ली), अभिमन्यू बबलू (१९, रा. नवी दिल्ली) व अल्पवयीन मुलास अटक केली आहे. चारचाकी वाहनामालकांना गाडीचे ऑईल लीक झाले आहे, असे सांगायचे. त्यानंतर वाहनमालक ते पाहण्यास बॉनेट उघडण्यास गेला असता दुसरा व्यक्ती गाडीतील बॅग, रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करण्याचे प्रकार नाशिक शहरात नुकतेच घडले. याप्रकरणी मुंबईनाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गुन्हे शाखा युनीट क्र.१ नाशिक शहर अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला. वाघ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. गुन्ह्याची कार्यप्रणाली पाहता दोन्ही गुन्हे एकाच गँगने केल्याचे गुन्हे शाखेस समजले.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळांची सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने संशयित आरोपी पुणे जिल्ह्यात असल्याचे समजले. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी पथकासह पुण्याकडे रवाना झाले. टोळीचा पाठलाग करत असताना सर्वजण अहमदनगर येथून शिर्डीत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक शिर्डीत आले. पथकाने सापळा रचत एका अल्पवयीन युवकासह चौघांना शिताफीने पकडले. त्यांनी नाशिक, औरंगाबाद, मुंबई येथे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पालकर तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले, आर. आर. पाटील, आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पुष्पा निमसे, बलराम पालकर, पोपट कारवाळ, बाळू दोंदे, रवींद्र बागूल, संजय मुळक आदींनी केली.

जप्त केलेला मुद्देमाल

२ नग सोन्याच्या बांगड्या, २ नग सोन्याच्या पाटल्या, ५९ हजारांची रोकड, २ ऑईल बॉटल, १ कुलंट बॉटल, रंगाचा डबा, ५ मोबाईल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -