वीजपुरवठा खंडीत झाल्याने महासभाच केली तहकूब

Nashik
Mahasabha
वीजपुरवठा खंडीत झाल्याने महासभाचे केली तहकूब

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने तहकूब करण्याची नामुष्की महापौरावर ओढावली. विशेष म्हणजे सभागृहातील माईक यावेळी सुरू होते. मात्र, विजेचे दिवे आणि पंखे बंद पडले होते. यावेळी विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत स्मार्ट सिटी मुद्द्यावर चर्चा होऊ द्यायची नाही म्हणूनच महासभा बंद पडण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला. १० मिनिटांनंतर महासभा पूर्ववत सुरू झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here