घरमहाराष्ट्रनाशिकआयपीएलवर सट्टा लावणारे तिघांवर कारवाई

आयपीएलवर सट्टा लावणारे तिघांवर कारवाई

Subscribe

राज्यस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील सामन्यावर मोबाईलवरुन सट्टा लावणाऱ्या तिघांना गुरुवारी, २५ एप्रिलला पोलिसांनी नाशिकरोड येथून ताब्यात घेतले.

राज्यस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील सामन्यावर मोबाईलवरुन सट्टा लावणाऱ्या तिघांना गुरुवारी, २५ एप्रिलला पोलिसांनी नाशिकरोड येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून, उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुक्तीधाममागील मैदानावर रात्री ९ वाजेच्या सुमारास काही व्यक्ती मोबाईलवरुन आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी मिलिंद जगताप यांना मिळाली होती. त्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश जगदाळे, काशिनाथ गोडसे, प्रजीत ठाकूर यांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी संजय विठ्ठलदास ठक्कर याला ताब्यात घेतले. त्याने उत्सव मंगल कार्यालयासमोरील जयहरीश थावरानी व अमजद जाहीद शेख यांच्या सहभागाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ३९ हजारांची रोकड व चार मोबाईल असा ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -