घरमहाराष्ट्रनाशिकआयपीएलवर सट्टा : तिघांना अटक, बुकी फरार

आयपीएलवर सट्टा : तिघांना अटक, बुकी फरार

Subscribe

आयपीएल क्रिकेट सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहून मोबाईलवर सट्टा लावणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली असून बुकी फरार झाला आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहून मोबाईलवर सट्टा लावणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली असून बुकी फरार झाला आहे. ही घटना महात्मानगर ग्राउंडसमोरील हॉटेल बंजारालगत हॉटेल प्रेसिडेंट इनच्या पहिल्या मजल्यावर घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

फिरोज बबुआ चौधरी (३१, रा.पर्ल रेसिडेन्सी, काठेगल्ली, व्दारका), मनिष अमृतलाल अग्रवाल (३२,रा अग्रवाल निवास, वोकहार्ट रूग्णालयासमोर), पवन ज्ञानेश्वर पाळदे (२९, रा. देवळाली कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बुकी जयेश सोमय्या (रा.इंदिरानगर) असे फरार झालेल्याचे नाव आहे. कोलकाता नाईड राईडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर चौघांनी सट्टा लावला. गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकास आयपीएल सामन्यावर चौघेजण सट्टा लावत असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार पथकाने महात्मानगरमधील हॉटेल प्रेसिडेंटवर छापा टाकला. पोलिसांनी तिघांना अटक केली. दरम्यान, बुकी जयेश सोमय्या फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून टी.व्ही., मोबाईल, रोकड, कार असा एकूण ६ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर. जी. सहारे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -