घरमहाराष्ट्रनाशिकलोखंडी जाळ्यांचे कवच अद्यापही अपूर्णच

लोखंडी जाळ्यांचे कवच अद्यापही अपूर्णच

Subscribe

दरड कोसळण्याच्या घटनांमुळे सप्तश्रृंग गडावरील प्रदक्षिणा मार्ग बंदच; सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सप्तश्रृृंग गडावर मोठं-मोठे दगड कोसळण्याच्या घटना घडल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात गडाभोवती लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम अद्याप पूर्णत्वास न गेल्याने काही भाग आजही धोकादायक स्थितीत आहे. प्रस्तावित काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेंगाळलेले असल्याने प्रदक्षिणा मार्गही बंद असून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरावर गडाच्या सुळक्याचे दगड कोसळल्यानंतर सुमारे तीन-चार वर्षापूर्वी या सुळक्याभोवती शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाने लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. हे काम देवी मंदिराच्या माथ्यावर आणि लगतच्या सुळक्याभोवती करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जपान येथील तज्ज्ञांच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे काम करण्यात आले. अतिशय उंचावरून कोसळणारे लहान खडे-दगड हे वरच्या वर अडकले पाहिजे, यासाठी गडावर तरंगलेल्या सुरक्षित लोखंडी जाळ्याही लावण्यात आल्या. यामुळे मंदिराच्या छतावर पडणारे दगड आणि सुळक्याचा धोकादायक भाग पडण्याचा धोका टळला होता. मात्र, गडाचा इतर भाग आजही कोसळत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाचे काम पुढील दोन-तीन टप्प्यांत करण्याचे प्रस्तावित आहे. दरम्यान देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची भाविकांची श्रद्धा असते. मात्र, गडाभोवती असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरही दरड कोसळते. यात प्रदक्षिणा घालताला एक युवक डोक्यावर दगड पडल्याने जागीच ठार झाला होता. तसेच काही भाविक गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर गडाचा उर्वरित भागही लोखंडी जाळ्यांनी सुरक्षित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

तात्पुरता उपाय म्हणून प्रदशिक्षणा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान आणि ‘पीडब्ल्यूडी’च्या पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी घेतला. तेव्हापासून हा मार्ग बंद आहे. आजही या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात दगडे कोसळत आहेत. मात्र, प्रदक्षिणा घालण्यास प्रतिबंध असल्याने जीवितहानी अथवा भाविक जखमी होण्याच्या घटना सध्या ऐकिवात नाहीत.

पायर्‍यांवर काँक्रिटचे कवच

गडावरून अगदी तीन-चार एमएम आकाराचा दगड वेगाने खाली कोसळला तरी भाविक रक्तबंबाळ होत असे. यावर उपाय आणि खबरदारी म्हणून देवस्थानने पायर्‍यांवर भाविकांच्या सुरक्षांसाठी सिमेंट काँक्रिटचे डोम उभारले आहेत. त्यामुळे वरून दगड पडले तरी भाविकांना सुरक्षितता मिळते.

- Advertisement -

दुर्घटनांमध्ये वाढ

गडावर जाणार्‍या घाटात दरडी कोसळत आहेत. याची खबरदारी घेण्यासाठी ‘पीडब्लूडी’ने कनिष्ठ अभियंत्यांची गडावर नियुक्ती केलेली आहे. या घाटातही काही ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, पावसाळ्यात नुकतीच मारुती घाटाजवळ दरड कोसळली होती. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटातही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. मात्र, या मार्गावरील संरक्षित जाळ्यांमुळे अधिक दरड कोसळून जीवितहानी होण्याचे टळले. परिणामी, महामार्गाची वाहतूक एका बाजूने सुरू ठेवणे शक्य झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -