घरताज्या घडामोडीपर्यटनस्थळी प्रत्येकाची नोंद बंधनकारक

पर्यटनस्थळी प्रत्येकाची नोंद बंधनकारक

Subscribe

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आदेश

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे खासगी बंगले, पर्यटन कॅम्पचे आयोजन करण्यात येणार्‍या जागेवर पर्यटक म्हणून अतिरेकी किंवा असामाजिक तत्व असणारे लोकदेखील वास्तव्यास येवू शकतात. विघातक लोकांकडून सार्वजनिक शांतता भंग, मानवी जिवितास धोका, आरोग्य असुरक्षिता व वित्तहाणी, बॉम्बस्फोट, गोळीबार, दंगली, मारामार्‍या यासारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने या गोष्टींवर प्रतिबंध करणे गरजेचे आहे. त्यामुळे जागामालकांनी प्रत्येक पर्यटकांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी बंधनकारक केले आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी खासगी बंगले, पर्यटन कॅम्पचे आयोजन करण्यासाठी तंबूंची व्यवस्था करणारे जमीनमालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांची माहिती असलेली नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. खासगी बंगल्यांचे मालक आणि कॅम्पचे आयोजन करणारे जमीनमालक यांच्यावर निर्बंध असण्यासाठी पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी 1 जानेवारी 2021 पासून आदेश जारी केला आहे. खासगी बंगले व पर्यटन कॅम्प आयोजकांसाठी आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

बंगले व फार्म हाऊस यांच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही संख्या व त्यांची रेकॉर्डींग सुरू असल्याची माहिती देणे हे खासगी बंगले, फार्महाऊस यांचे मालकांना बंधनकारक आहे. बंगले, फार्म हाऊस या ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असून, सीसीटीव्ही फुटेजचे रॅकॉर्डींग डिव्हीआर किंवा एनव्हिआर हे 30 दिवसांपर्यंत राहील असे
ठेवण्यात यावे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्थेवर कारवाई केली जाणार आहे.

अशी ठेवावी लागणार नोंद

- Advertisement -

जागामालकांनी पर्यटक किंवा अतिथी यांना बंगला किंवा जागाभाडे तत्वावर देताना कॉलमनुसार माहिती रजिस्टरमध्ये नोंदवावी. पर्यटकांची एकूण संख्या, सर्वांची नावे, पत्ते, ओळखपत्रे, सर्वांचे मोबाईल क्रमांक, ज्या वाहनातून आले, त्या वाहनाचा क्रमांक, पर्यटक किंवा अतिथी हे कोठून आले, त्याचा दिनांक व जाण्याचा दिनांक व स्वाक्षरी आदी बाबींची नोंद ठेवावी लागणार आहे. पर्यटकांचे ओळखपत्र आधारकार्ड झेरॉक्स रेकॉर्ड म्हणून ठेवावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -