कांदा निर्यातबंदी विरोधात कळवण शिवसेनेचे निवेदन

निर्यातबंदी उठवण्याची मागणी

kalwan shiv sena
Advertisement

केंद्र सरकारने घोषित केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून निर्यातबंदी उठवण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, विधानसभा सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, विभागप्रमुख शीतलकुमार आहिरे, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, आप्पा बुटे, संजय रौंदळ, किशोर पवार, युवासेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, ललित आहेर आदी उपस्थित होते.