घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाटात दरड कोसळली, तासाभराने वाहतूक सुरळीत

कसारा घाटात दरड कोसळली, तासाभराने वाहतूक सुरळीत

Subscribe

संततधार पावसामुळे पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पॉइंटजवळ रविवारी सकाळच्या सुमारास घडली घटना

नाशिकहून मुंबईला जाणार्‍या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पॉइंटजवळ रविवारी सकाळच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.

या घटनेची माहिती समजताचं टोलप्लाझावरील पिंक इंफ्राचे कर्मचारी व कसारा घाटातील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. रविवार असल्याकारणाने मुंबई महामार्गावर वाहतूक जास्त प्रमाणात आहे. पावसामुळे घाटात ठीक ठिकाणी धबधबे तयार झाले असून प्रवासी कार चालक धबधबे पाहण्यासाठी गर्दी करत असल्यानेही अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच कालपासून पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धुके आले आहे. यामुळे वाहनचालकांना कसारा घाटातून अत्यंत संथगतीने प्रवास करावा लागत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -