घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाट रेल्वेमार्ग ‘सीसीटीव्ही’ कक्षेत

कसारा घाट रेल्वेमार्ग ‘सीसीटीव्ही’ कक्षेत

Subscribe

अपघाताच प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

इगतपुरी घाटातील रेल्वेमार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर कोसळणार्‍या दरडींची माहिती मिळणार आहे. अनेकवेळा रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. तसेच अपघाताचाही धोका असतो. सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे या घटना रोखण्यास मदत होऊ शकेल.

नाशिकचा कसारा घाट दिसायला मनोहारी, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला परिसर म्हणून पर्यटकांचा आकर्षण बिंदू आहे, तेवढाच धोकेदाय आहे. कधी कुठून दरड कोसळेल याचा नेम नाही. इगतपुरी कसारा घाट परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असतात, हा परिसर घाट माथ्याच्या डोंगरदर्‍यांचा परिसर आहे. या भागातून रेल्वे चालवणे कायमच आव्हानात्मक राहिलेय. अनेकवेळा रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत होतेच शिवाय अपघाताचाही धोका असतो, त्यामुळेच कसारा घाट ते इगतपुरी रेल्वेस्थानक दरम्यान ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून रेल्वे ट्रॅक सुरक्षित आहे की नाही याबाबत प्रशासनाला माहिती मिळते.

- Advertisement -

15 दिवसांपूर्वी कसारा घाटातील बोगद्याच्या तोंडावर मातीचा भराव पडल्याने वाहतुकीवर परीणाम जाणवला होता, त्या पार्श्वभूमीवर ट्रॅकवर असणारे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या रेल्वे मार्गावर अप डाउन मार्गावर दोन्ही मार्गांवर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे कुठे अपघात घडला याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळू शकणार आहे. तसेच संभाव्य धोक्याची माहितीही यामुळे उपलब्ध होऊन त्यावर वेळीच उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच वैतरणा धरण येथील जलविद्युत प्रकल्पावर दरड कोसळली, त्यामुळे अजूनही हा प्रकल्प बंद आहे. गत आठवडयात कसारा घाटात काशी एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरल्याने वाहतुकीस खोळंबा झाला होता. मात्र, आता या कॅमेर्‍यामुळे घाटात मातीचा भराव कोसळत असल्याची त्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळून या मार्गावरून रेल्वेला सिग्नल देण्यात येऊन संभाव्य आपत्ती टाळता येणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -