वाचा.. काय म्हणाले मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठराविक मुद्दे..

Nashik

नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या महाजनादेश यात्रेच्या तिसर्‍या टप्प्यातील भाषणाचे ठराविक मुद्दे

प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या चरणस्पर्शाने पावन आणि आदिमाया आदिशक्ती महिषासूर मर्दिनी सप्तश्रुंगी मातेच्या निवासाने पवित्र अशा नाशिकच्या या धर्मभूमीला माझा शतशत नमस्कार

 

#Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे महाजनादेशयात्रा सभेला संबोधित करणार

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2019

आज मी एक विशेष धन्यता अनुभवतो आहे आणि मी आपल्या जीवनातील मौल्यवान क्षण अनुभवतो आहे. कारण, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजेंनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा सन्मानदेखील आहे आणि छत्रपती शिवरायांच्या दायित्वाचा संकेतदेखील आहे.

पुरातन काळापासून आमच्याकडे यात्रेची सांस्कृतिक परंपरा राहिलेली आहे. यात्रेचे मोठे महात्म्य् राहिलेले आहे. यासोबतच अशीही परंपरा, जिथे यात्रा करुन परतलेल्यांना नमस्कार करतात आणि त्याचे अर्धे पुण्य मिळवतात . मीदेखील आज देवेंद्र यांच्या महाजनादेश यात्रेला नमन करण्यासाठी आलो आहे.

पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर आणि प्रगतीशील, विकासशील सरकार देवेंद्र यांनी दाखवून दिशाही दिली.

गुजरात तुमचाच लहान भाऊ. कधीकाळी एकाच ताटात जेवण करत होते. विभाजनानंतर गुजरातच्या पूर्ण जीवनात सर्वात अधिक काळ सेवेची संधी मला दिली होती.

फडणवीसांचे रिपोर्ट कार्ड नव्हे महाऱाष्ट्राच्या प्रगतीची कहानी. आगामी काळातील विकासाचे संकेतही आहेत. भाजपच्या सरकारची हीच खासियत आहे की वेळोवेळी हिशोब दिला जातो.

शेतकरी कुटुंबांना किसान सन्मान निधीचा लाभ देण्याचा शब्द दिला होता. सरकार स्थापनेनंतर आता २० हजार कोटींहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यांत ही रक्कम दिली जाते आहे. १५०० कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत आहेत.

देशाच्या सैन्याच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक पाऊल उचलले जाईल. दोन महाशक्तीशाली हेलिकॉप्टर्स दाखल झाले. राफेल फायटर जेट आलेत. तिन्ही सेनांतील समन्वयासाठी प्रमुख. प्रत्येक आश्वासन पूर्तता केली जाते आहे.

नाशिक भोंसला मिलिटरी स्कूल हे मिलिटरी म्हणून ओळखले जाते आहे. एवढेच नव्हे तर हे जॅकेट भारतातच बनावेत यासाठीही प्रयत्न केले. सेनाच नव्हे तर आता त्यापुढे जाऊन जगातील काही देशांप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० पेक्षा अधिक देशांत निर्यात केले जात आहेत. भाजप सरकारचा अर्थच आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. त्यापेक्षा मोठे काही नाही. म्हणूनच आम्ही शब्द देतो आणि त्याला पूर्णही करतो.

महाराष्ट्रासह देशाला आश्वासन दिले होते. जम्मूकाश्मीर, लडाखच्या समस्यामुक्तीसाठी नवे प्रयत्न करू. आज समाधानाने सांगतो की, देश त्या स्वप्नपूर्तीसाठी निघाला आहे. हा केवळ निर्णय नाही, १३० कोटी भारतीयांच्या भावना आणि इच्छेचे फलित आहे. जम्मूच्या लोकांना हिंसेच्या चक्रातून काढणारा निर्णय आहे.

शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते जेव्हा काही मतांसाठी चुकीची बोलतात तेव्हा खूप दुःख होते. पवारांना शेजारील देश चांगला वाटतो. ही त्यांची मर्जी.. तेथील शासक, प्रशासक कल्याणकारी वाटतात. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र जाणतो , भारत जाणतो, संपूर्ण जग जाणते की दहशतवाद कुठून सुरू आहे.

सावरकरांचे नाशिकचे नाते सर्वांना माहितेय. देशासाठी आनंदाने यातना सहन करणार्‍या सावरकरांची प्रेरणा घ्यायला हवी.

देशाच्या प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर देण्यासाठी आम्ही निघालोय. २ कोटी घरे दिलीत. धूरापासून मुक्ततेचा पहिला टप्पा पूर्ण केला. ८ कोटी उज्वला गॅस कनेक्शन दिले. २०२२ पर्यंत भारताला सिंगल युज प्लास्टिक मुक्त अभियान सुरू आहे. २ ऑक्टोबरपर्यंत गांधी जयंतीपर्यंत.. प्लास्टिक निर्मूलनासाठी पुढाकार. जलजीवन मिशन. घरघर जल पोहोचवण्याचे व्यापक अभियान देशात सुरू आहे.

फडणवीस यांच्या टीमला शुभेच्छा. महाराष्ट्र यात चांगले काम करतोय. जलयुक्त शिवार योजनेत १७ हजार गावांना जलसंकटापासून मुक्तता. आगामी पाच वर्षांत या अभियानाला अधिक् गती द्यायची आहे. महाराष्ट्र पाण्याबाबत संपन्न झाला की, नव्या संधी, रोजगारांना कुणी थांबवू शकणार नाही.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाला डबल इंजिन दिले. रोजगारनिर्मितीली बळ दिले. हेरिटेज पर्यटनासाठी विमानतळाला उडाण योजनेशी जोडले गेले तसेच रामायण सर्किटमध्ये समाविष्ठ केले गेले. पर्यटकसहज पोहोचून समाधानाने परतावे यासाठी त्र्यंबकला विकास केला. आगामी काळात डिफेन्स इनोव्हेशन हबच्या माध्यमातून नाशिक भारताच्या सुरक्षेच्या सामुग्री निर्मितीचे प्रमुख केंद्र बनेल. त्यासाठी काम सुरू आहे. मल्टि लॉजिस्टिकलोडशेडिंगमुक्तीसाठी भाजप सरकार गरजेचे आहे.

राममंदिराच्या मुद्द्यावरून काही लोक फक्त बोलत असतात. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना, त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. असे असतानाही बोलघेवडे कुठून येतात, याचे आश्चर्य वाटते. कोर्टावर, आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास असला पाहिजे. भारताच्या न्यायव्यवस्थेवर असला पाहिजे. नाशिकच्या पवित्र भूमितून अशा बोलघेवड्या लोकांना आवाहन करतो की प्रभू रामासाठी डोळे बंद करून भारताच्या न्याया व्यवस्थेवर विश्वास ठेवा. चला चला चला, पुन्हा चला पुन्हा आणूया आपले सरकारजय भीम, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजीभारत माता की जय….

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here