आडगावात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ

विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला

lepord dead

कोणार्कनगर न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे सकाळी ७ वाजेच्या सुमारास राजाराम माळोदे आपल्या शेतात औषध फवारणीसाठी गेले असता त्यांना मृतावस्थेतील बिबट्या नजरेस पडला. आडगावात मृत बिबट्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

माळोदे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवत मृत बिबट्याला ताब्यात घेतले. बिबट्याच्या शरीरावर कोणत्याच जखमा नसल्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला असावा यांची उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. वनविभागाने प्राथमिक अंदाज देताना हा बिबट्या चार ते पाच वर्षांचा असून मृत्यू विषबाधा  झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजेल, अशी माहिती वनविभागाने ग्रामस्थांना दिली आहे.