एकलहरे परिसरात आणखी एक बिबट्या जेरबंद

Nashik
WhatsApp Image 2019-07-21 at 11.17.00
एकलहरे परिसरात आणखी एक बिबट्या जेरबंद

दहा ते बारा दिवसांपूर्वी चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच आज (दि.२१) सकाळी सामनगाव-एकलहरे रोड परिसरात आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. वस्तीत येऊन नागरिक तसेच जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना या भागात घडत होत्या. वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात काल(शनिवार) बिबट्या जेरबंद झाला. ही बातमी परिसरात पसरल्याने सकाळी बघ्यांनी गर्दी केली होती.

वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले आहे, मात्र अजून ही या परिसरात बिबट्या आणि त्याची पिल्ले असल्याने भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.