घरमहाराष्ट्रनाशिकगंगापूर गावाजवळ शेतीच्या रक्षणासाठी पाळलेल्या डॉबरमनलाच बिबट्याने केले फस्त

गंगापूर गावाजवळ शेतीच्या रक्षणासाठी पाळलेल्या डॉबरमनलाच बिबट्याने केले फस्त

Subscribe

मुक्त विद्यापीठासह गंगापूर गावाजवळ बिबट्याचे पुन्हा दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गंगापूर गावाजवळ शिंदे लोकवस्ती परिसरात बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे शेतीच्या रक्षणासाठी पाळलेल्या डॉबरमन जातीच्या कुत्र्यालाही फरफटत नेत बिबट्याने त्याचा फडशा पाडल्याने, गोठेधारकांमध्येही भीती आहे.

गंगापूर गावापुढे कानेटकर उद्यान आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यादरम्यान असलेल्या शिंदे यांच्या फार्महाऊसजवळ मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कुत्रे जोरजोराने भुंकत असल्याच्या आवाजाने रहिवाशांना जाग आली. दरम्यान, बिबट्याने परिसरातील विजय शिंदे यांच्या शेतीवरील पाळीव डॉबरमन जातीच्या कुत्र्याला काही अंतरावर फरफटत नेवून त्याला फस्त केले. चंद्रकांत लांबे यांच्या शेतीत बिबट्याच्या पायांचे ठसे दिसल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. फार्महाऊस परिसरातील झाडा-झुडुपांत बिबट्याने सकाळी आठपर्यंत मुक्काम ठोकला होता. त्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या लायब्ररीजवळही सायंकाळी साडेपाच वाजेला बिबट्याने कर्मचाऱ्यांना जवळून दर्शन दिल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

दरम्यान, गंगापूररोडवरील सावकरकर नगर परिसरात बिबट्याने धुमाकूल घातल्याची घटना ताजी असतानाच घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने या भागात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत वनविभागास माहिती दिली असता वनपाल जी .एस वाघ, वनरक्षक सचिन आहेर, एस. डी. महाजन, आर. सी. हकीम या वनविभागाच्या पथकाने तालुका पोलीस कर्मचाऱ्यांसह या भागात पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -