घरमहाराष्ट्रनाशिकशेडनेटमध्ये अडकला बिबट्या

शेडनेटमध्ये अडकला बिबट्या

Subscribe

वडगाव पिंगळा भागातील घटना

वडगाव पिंगळा (सिन्नर) येथील माधवराव गंधास यांच्या घराला लागून असलेल्या शेडनेटमध्ये बिबट्या अडकल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वन विभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांनाही गर्दी केली असल्याचे समजते.
शेडनेटमधील शिमला मिरचीला शुक्रवारी (दि.२९) सकाळी पाणी देण्यासाठी शेतीमालक अरुण विंचू हे गेले असता आत गेल्यावर अचानक बिबट्या त्यांच्या समोर आल्याने त्यांची भितीने भंबेरी उडाली. त्यांनी शेडनेटच्या बाहेर धाव घेत दरवाजा बंद केला. त्यानंतर पोलीस पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सिन्नर येथील वन विभागाचे अधिकारी व पोलिसांना माहिती दिली. शेडनेटचे गेट चुकून उघडे राहिल्याने बिबट्या आत गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान वन विभागाने दुपारनंतर याठिकाणी शेडनेटच्या गेटजवळ पिंजरा लावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -