साहित्यातून माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते : कवी रवींद्र मालुंजकर

ग्रामीण भागातून आजही भावगीते, जात्यावरिल ओव्या यातून अस्सल ग्रामीण संस्कृती जिवंत आहे, शेतातील पिकांची राखणी असो लग्नातील गीते असो किंवा शेतकर्‍यांंच्या समस्या त्यातून नेहमीच साहित्यिकांना प्रेरणा मिळत आली आहे आणि यातूनच साहित्य निर्मिती होते. या साहित्यातून माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते, असे प्रतिपादन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.

Nashik
Sahitya sammelan vaadivrhe
साहित्य संमेलनात बोलताना कवी मालुंजकर. समवेत मान्यवर.

ग्रामीण भागातून आजही भावगीते, जात्यावरिल ओव्या यातून अस्सल ग्रामीण संस्कृती जिवंत आहे, शेतातील पिकांची राखणी असो लग्नातील गीते असो किंवा शेतकर्‍यांंच्या समस्या त्यातून नेहमीच साहित्यिकांना प्रेरणा मिळत आली आहे आणि यातूनच साहित्य निर्मिती होते. या साहित्यातून माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते, असे प्रतिपादन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.

इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २० वे ग्रामीण साहित्य संमेलन वाडीवऱ्हे येथील इंदुमती लॉन्स येथे पार पडले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सर्वप्रथम पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी कवी किशोर पाठक, प्रा. राज शेळके, मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, कवी विवेक उगलमुगले, मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ, सुरेखा बोराडे, प्रा. देवीदास गिरी, स्वागताध्यक्ष रावसाहेब कातोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रावसाहेब कातोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पुंजाजी मालुंजकर यांच्या ‘कोणासाठी’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘वाचन हेच जीवन, विकासाचे साधन’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आले. त्यात पुंजाजी मालुंजकर, विवेक उगलमुगले, प्रा. राज शेळके व सुरेखा बोराडे यांनी सहभाग घेतला. यानंतर विविध पुरस्करार्थींना पुरस्कार वितरण करण्यात आले.

या साहित्य संमेलनात विजयकुमार मिठे, सावळीराम तिदमे, विलास पगार, गौरवकुमार आठवले, राजेंद्र उगले, डॉ. भास्कर म्हारसाळे, प्रा. संजय जाधव, जास्वंती मोजाड, संजय कान्हव, रवींद्र पाटील, अलका कोठवदे, विद्या पाटील, दशरथ झणकर, मधुकर पाटील, राजू आतकरी, बाणेश्वर मालुंजकर, शिवाजी क्षीरसागर आदींसह साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चित्रांगण क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. बाळासाहेब पलटने यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. ज्ञानेश्वर गुळवे यांनी सूत्रसंचालन केले.

द्वितीय सत्रांत सहस्रबाहू दिवाळी अंकातील लेखक कविता स्पर्धकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर काकन, तर नंतरच्या सत्रांत कविसंमेलन झाले. यात पन्नास कवींनी आपल्या रचना सादर केल्या. अखेरच्या सत्रात पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.