उपबाजार समितीचे गाळे स्थानिकांना मिळावे: सुरेश गंगापुत्र

ञ्यंबकेश्वर येथे गाळे दरवाढीविरोधात बैठक

suresh gangaputr

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ञ्यंबकेश्वर येथील प्रस्तावित उपबाजारातील गाळ्यांच्या अन्यायकारक दरवाढीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकर्‍यांनी ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत बैठक घेतली. यात प्रस्तावित गाळ्यांचे ठरविण्यात आलेले दर कमी करून स्थानिक शेतकर्‍यांनाच गाळे देण्यात यावा, असा ठराव करत बाजार समितीचा निषेध करण्यात आला.

यावेळी नाशिक जिल्हा बँक संचालक परवेज कोकणी, ज्येष्ठ नेते कैलास मेढे-पाटील, शांताराम बागूल, समाधान बोडके, संपत चव्हाण, नवनाथ कोठुले, रवी वारुणसे, पुरुषोत्तम कडलग, अरुण मेढे, धनंजय तुंगार, शांताराम बागूल, विष्णू खाडे, नबीयुन शेख आदी उपस्थित होते.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

येत्या १९ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे बाजार समितीच्या मोकळ्या जागेत गाळे बांधण्याच्या कामासह विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रस्तावित गाळ्यांचे दर प्रतिस्क्वेअर फुटाने जवळपास २० ते ३० लाखापर्यंत जात असल्याने तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी ते घेऊ शकत नाहीत. यामुळे संचालक मंडळाने हे दर कमी करून स्थानिक शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांनी केली. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा गंगापुत्र यांनी यावेळी दिला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवटीतील मुख्यालयात असलेले गाळे अल्प दरात उपलब्ध असताना आदिवासी तालुका असलेल्या ञ्यंबकेश्वर येथील गाळे चढ्या भावाने ठरवून व्यापारी व मर्जीतील गर्भश्रीमंत लोकांच्या घशात गाळे घालण्याचा संचालक मंडळाचा डाव असल्याचा घणागात बँकेचे संचालक परवेज कोकणी यांनी केला. हा प्रयत्न हाणून पाडू, शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी दिला.

बाजार समिती संचालकांना जाणीव करून देणे, शेतकरीहीत लक्षात घेणे गरजेचे असून, हे गाळे करोडो रूपये कमवण्यासाठी उठाठेव, गाळे व्यापारी, आडत यांना देण्याचे नियोजन याविरोधात करण्यासाठी उठाव करणे आवश्यक पुर्वजांच्या पुण्याईने मिळणारी जागा वाचवणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी उपसभापती युवराज कोठुळे यांनी भूमिपूजनास विरोध करू नका काम चांगले होणार असून शेतकरीहिताच्या मागणीचा विचार करून गाळे दरांबाबत योग्य निर्णयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

भास्कर मेढे, सुरेश मिंदे, रोहीदास बोडके, रावसाहेब सकाळे, परशुराम पवार, भावडू बोडके, पांडुरंग आचारी, शरद मेढे, संजय मेढे, रतन कसबे, आनंदा कसबे, शिवाजी कसबे, रावसाहेब कोठुळे, तानाजी कड, रंगनाथ मिंदे, भागवत गांगुर्डे आदी उपस्थित होते.