घरमहाराष्ट्रनाशिकमतदारराजा आज देणार ‘महाकौल’

मतदारराजा आज देणार ‘महाकौल’

Subscribe

मिशन वोटिंग : ४,७२० मतदान केंद्रांवर सज्जता

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवार २९ एप्रिलला होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. दोन्ही मतदारसंघासात सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्हयात एकूण ४५ लाख ५ हजार ३२० मतदार असून त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या मतदानासाठी दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुक अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह रविवारी आपापल्या नियुक्तीच्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. नाशिकमध्ये १८ उमेदवार आपले नशीब आजमावत असून यात महागठबंधनचे समीर भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, अपक्ष अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात चौरंगी लढत पहायला मिळत आहे, तर दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या डॉ. भारती पवार, महाआघाडीचे धनराज महाले तर, माकपचे जीवा पांडू गावित नशीब बजमावत असून या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, बँक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याव्दारा निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड.

- Advertisement -

मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार, उमेदवार, निवडणुक प्रतिनिधी, यांना मोबाईन फोन, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट यांचा वापर करण्यास भारत निवडणुक आयोगाने सक्त मनाई केली असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल वापरू नये असे निर्देश देण्यात आले आहे.आयोगाच्या नियमानूसार मतदान केंद्रापासून १०० मीटरपर्यंत सेल्फी काढणे, मोबाईलने रेकॉर्डींग करण्यावर बंदी आहे.

नाव शोधण्यासाठी बघा ही लिंक

- Advertisement -

https://www.nvsp.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युवर नेम इन इलेक्ट्रोल रोल वर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलमे आपका स्वागत है असे वाक्य झळकेल. यावर माहीती टाकल्यानंतर मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.

१२ हजार दिव्यांग मतदार, वाहन व्यवस्थेसाठी साधा संपर्क

आयोगाच्या निर्देशानुसार यंदा दिव्यांग मतदारांची स्वतंत्र नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हयात १२ हजार मतदारांची नोंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी व्होटर म्हणून या मतदारांच्या नावापुढे उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपव्दारे दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरची आवश्यकता असल्यास किंवा मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था हवी असल्यास नोंदणी करू शकता. तसेच, १९५० या क्रमांकावर विनंती नोंदविल्यास मतदान केंद्रापर्यंत आणण्याची सोय असेल. समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, 8830049228 या क्रमांकावर संपर्क साधल्यास दिव्यांग मतदारांना मदत उपलब्ध होऊ शकेल.

नाशिक मतदार संघावर एक दृष्टीक्षेप

  • एकूण मतदान केंद्र – ४,७२०
  • क्रिटीकल मतदान केंद्र – ६८
  • नाशिक लोकसभा मतदारसंघा क्रिटिकल मतदान केंद्र – ५३
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघात क्रिटीकल मतदान केंद्र – १५
  • सखी मतदान केंद्रे – १५
  • आदर्श मतदान केंद्रे – १५
  • पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरीच्या काही भागात मोबाईलला रेंज नसल्याने रनर राहणार कार्यरत
  • नाशिक लोकसभेत – १० अपक्ष उमेदवार
  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे – ३ उमेदवार
  • दिंडोरीत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे – ४ उमेदवार
  • निवडणुकीसाठी – २७ हजार १९५ कर्मचारी नियुक्त
  • प्रत्येक विधानसभानिहाय मतदारसंघासाठी – ४ भरारी पथके तैनात
  • प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक
  • अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका
  • वयोवृध्द, ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांना रांगेत उभे न राहता थेट मतदान करण्यासाठी प्रवेश
  • निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सज्ज
  • मतदानासाठी जिल्हयातील ७५ आठवडे बाजार राहणार बंद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -