घरमहाराष्ट्रनाशिकआघाडीने ५० तरी जागा जिंकून दाखवाव्यात

आघाडीने ५० तरी जागा जिंकून दाखवाव्यात

Subscribe

गिरीश महाजन यांनी दिले खुले आव्हान

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला थेट आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 पैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा. मुख्यमंत्री त्यांचा होणे हा फार दुरचा विषय आहे, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. मी सांगितलेले आकडे खोटे ठरत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधलाया असता कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा दिल्या मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 पैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा. मी सांगितलेले आकडे खोटे ठरत नाहीत, असे थेट आव्हान दिले. मुख्यमंत्री त्यांचा होणे हा फार दुरचा विषय, असेही ते काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्देशून म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -