ञ्यंबकेश्वर येथे होणार बाजार समिती इमारत

ई-निविदेस देण्यात आलेली स्थगिती सहकार व पणन विभागाकडून उठवण्यात आल्याने सुविधा

Trambakeshwar
Trambakeshwar bazar samiti buillding

ञ्यंबकेश्वर : गतवर्षी ञ्यंबकेश्वर व हरसुल येथे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भव्य इमारतीसह इतर कामांच्या ई-निविदेस देण्यात आलेली स्थगिती सहकार व पणन विभागाकडून उठवण्यात आल्याने ञ्यंबकेश्वर येथील इमारत बांधकाम करण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
ञ्यंबकेश्वर व हरसुल येथे बाजार समितीच्या हक्काच्या जागेत इमारतीसह शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध बाबींत सुधार होणे गरजेचे असल्याने शेतकर्‍यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होत आहे. पुढील महिन्यात ञ्यंबकेश्वर येथे इमारतीसह विविध पायाभूत सुविधेचे कामांचे भूमिपूजन सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते होणार असल्याचे संचालक मुळाणे पाटील यांनी सांगितले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ञ्यंबकेश्वर तालुक्यातून संचालक म्हणून पाच संचालक अनुक्रमे संपत सकाळे, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, रवींद्र भोये, ताराबाई माळेकर हे निवडून आले. पाच वर्षात सकाळे यांना सभापती तर युवराज कोठुळे यांना उपसभापती तसेच तीन वेळा प्रभारी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यात पाचही संचालकांच्या पाठपुराव्याने अनेक वर्षाची शेतकर्‍यांची भव्य इमारतींची मागणी पूर्ण होत असल्याने संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.